पुण्यातल्या पत्रकाराला मिळणार भाजपकडून विधानसभेची उमेदवारी….?
पुणे- जुने ,जाणते आणि जीवनप्रवासातील यशस्वी पत्रकार ज्यांना सर्व माध्यमांच्या प्रत्येक प्रतिनिधींची तर माहिती आहेच ,पण पुण्याच्या समस्या आणि त्या सोडवणुकीसाठी करावे लागणाऱ्या उपाय योजना यासाठी ज्यांच्याकडे दिशा देण्याची उर्मी आहे अशा पुण्यातील एका पत्रकाराला भाजपने शिवाजीनगर मतदार संघातून उमेदवारी द्यायचा निर्णय घेतल्याचे अनेकांना धक्कादायी वाटेल असे वृत्त हाती आले आहे .
भाजपने हडपसर मधून विद्यमान आमदाराचा पत्ता मनसेच्या इच्छुकाने आणि एका आर टी आय कार्यकर्त्याने केलेल्या पोलखोली मुले कापल्याचे आज वर स्पष्ट झाले आहे . त्यामुळे हि जागा भाजपने आता सेनेसाठी सोडल्याचा निर्णय घेतला आहे फक्त त्याची अधिकृत घोषणा बाकी असल्याचे मानले जाते . या शिवाय शिवाजीनगर मतदार संघ देखील भाजप सेनेला सोडणार अशा बातम्या होत्या . या दोन्ही मतदार संघातील विद्यमान आमदारांनी ना पक्षासाठी काही केले ,ना जनते साठी काही केले ,निव्वळ स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला असा आरोप पक्षातील कार्यकर्त्यांनीच चालविला आहे यासह अशीच नाराजी खडकवासला विधानसभा मतदार संघातून देखील भाजपच्या कार्यकर्त्याकडून व्यक्त केली जाते आहे . पण पक्षाच्या सर्वेसार्वो असलेल्या मुख्यमंत्र्यांपुढे याबाबत ची सर्व कथा व्यथा पोहोचलेली नसली तरी खासदार गिरीश बापट आणि भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले हे पुण्याच्या आठ हि विधानसभा मतदार संघातील आमदारांची कार्यपद्धती ते चांगलेच जाणून आहेत . या पार्श्वभूमीवर या दोहोंची मते मुख्यमंत्री विचारात घेऊनच उमेदवारी देण्याबाबतचा स्वतःचा निर्णय अमित शहा यांना कळवून जाहीर करतील असे सांगितले जाते आहे .
राष्ट्रावादी च्या बड्या नेत्यांना दबावाखाली ठेवून कॉग्रेस चे पानिपत करण्याचे तंत्र मुख्यमंत्री अवलंबित असताना त्यांना दुसरीकडे राष्ट्रवादी च्या नेत्यांच्या किंवा कॉंग्रेसच्या अधिपत्याखाली राहिलेले चेहरे नको आहेत . शिवाजीनगर मधून सेनेला जागा सोडताना भानुप्रताप बर्गे किंवा विनायक निम्हण या दोघांपैकी एकाला सेना उमेदवारी देवू शकते असे दिसते आहे . मात्र निम्हण यांच्या नावासाठी भाजप मध्ये नाराजी आहे तर बर्गे यांच्या साठी फारशी उत्सुकता भाजपमधून दाखविली जात नाही या पार्श्वभूमीवर शिवाजी नगरची जागा राखणे ,कॉंग्रेसच्या हाती जावू न देणे हि जबाबदारी आपली असल्याचे सांगत एका नेत्याने शिवाजीनगर मतदार संघातून आपला घनिष्ठ सहकारी असलेल्या पुण्यातील सामाजिक कामाची नाळ कायम जोडून ठेवलेल्या एका पत्रकाराचे नाव येथील उमेदवारी साठी सुचविल्याचे वृत्त आहे आणि एका फौंडेशन मार्फत सामाजिक कामाशी नाळ कायम ठेवलेल्या या तथाकथित तरुण पत्रकाराने देखील या दृष्टीने कामास प्रारंभ केला आहे. आणि विशेष म्हणजे त्याला भाजपच्या अनेक नगरसेवकांनी साथ द्यायला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये काहींनी आपण शिवाजीनगर मधून इच्छुक असल्याचा दावा हि केला होता .
एकूणच अनपेक्षित असे नवे किमान २ चेहरे तरी पुण्यातील विधानसभा मतदार संघातून भाजपकडून देण्यात येतील असे सध्या तरी दिसते आहे.