पुणे – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याती माजी सहकार मंत्री उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबईमध्ये दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील उद्या कमळ हाती घेणार आहेत. दरम्यान हर्षवर्धन हे भाजपच्या वतीने लढणार असून इंदापूरच्या सेनेची जागा त्यासाठी सोडण्यात येणार आहे या बदल्यात पुणे शहरात भाजपच्या आठ विद्यमान आमदारांपैकी 1जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त आहे .यामध्ये हडपसर ,खडकवासला आणि वडगाव शेरी या मतदार संघाची नावे घेतली जात आहेत .मूळ पुण्यातून सेनेचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी 1 जागा आणि इंदापूर च्या बदल्यात 1 जागा अशा या ३ मधून २ मतदार संघांतून शिवसेनेला लढण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे .
हर्षवर्धन पाटील यांनी 4 सप्टेंबरला जलसंकल्प मेळावा घेतला होता. यावेऴी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश करावा आणि विधानसभा लढवावी असे समर्थकांचे म्हणणे होते. अखेर उद्या हर्षवर्धन पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील हे नाराज होते. इंदापूरच्या गाजलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशाची मागणी केली होती. इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील हे भाजपकडून लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.