काकडे हाऊसवर गिरीश बापट ..( पुणेरी राजकारण )
पुणे-सुरेश कलमाडी नंतर पुण्याचे नवे नेतृत्व म्हणून उदयास येण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले मराठा आणि बहुजन समाजाशी जवळीक असलेले राज्यसभेतील अपक्ष खासदार संजय काकडे यांच्या घौडदौडीला सातत्याने लगाम घालण्याचे पुणेरी राजकारण केल्याचा ज्यांच्यावर नेहमी आरोप होत आला ते पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे स्थानिक ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांनी लोकसभा रिंगणात भाजपच्या वतीने उमेदवारी मिळवल्यावर आज काकडे हाऊस वर जावून ‘खरोखर नाना तुम्ही माझ्या यशासाठी क्रीम रोल निभवावा,महत्वाची भूमिका निभवा ‘ अशी विनंती केली .
काकडे कुटुंबीयांनी यावेळी बापट यांचे स्वागत करून त्यांना निवडणुकीत यशासाठी शुभेछ्या दिल्या .
गेल्या महापालिका निवडणुकीत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडल्यानंतर भाजप कडून सर्व प्रथम काकडे यांनी उमेदवारी मागितली होती ,पण त्यानंतर हि त्यांची पुणेरी राजकारणात उपेक्षा होत गेली . मुख्यमंत्री हे त्यांचे मित्र असल्याने त्यांनी बाराच काळ भाजपमध्ये स्थानिक पातळीवर पुणेरी राजकारणातील उपेक्षा सहन केली.पण नंतर मात्र कॉंग्रेसचे दिल्लीद्वार गाठले आणि तशी घोषणा पुण्यात येवून केली सुद्धा. पण या निर्णयाने धक्का बसल्याचे समजू न देता , काकडे यांना कॉंग्रेसच्या दरवाजातून खेचून आणण्याचे यशस्वी प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केले. बापट यांना उमेदवारी देवून पश्चिम महाराष्ट्राच्या प्रचाराची धुरा आपण काकडे यांच्यावर सोपवितो आहे असे त्यांनी स्पष्ट केले . पण त्यांनतर हि बापटांनी पत्रकार परिषदेत ‘काकडे यांचा क्रीम रोल ‘ अशी टिप्पणी केली. हि टिप्पणी बापटांनी कोणत्या अर्थाने ,भावनेने केली याहून लक्ष वेधले गेले ते या टिप्पणी ने हशा पिकला याकडे … त्यानंतर काकडे कोल्हापूरच्या प्रचार शुभारंभाला सर्व नेत्यांसमवेत उपस्थित राहिले. मात्र काल संध्याकाळी झालेल्या पुण्यातील प्रचार शुभारंभाच्या पहिल्याच सभेला त्यांनी दांडी मारली .आणि सभेला झालेली गर्दी मुख्य वक्त्यांच्या भाषणापूर्वीचं पांगली . तत्काळ याची दखल माध्यमांनी घेतली . आणि आज बापट यांनी काकडे हाऊस गाठले .आणि आपल्या लोकसभा निवडणुकीतील यशासाठी शुभेछ्या मिळविल्या . आता येणारा काळ चं या शुभेछ्या मनापासून मिळाल्या कि पुणेरी पद्धतीनेच मिळाल्या हे स्पष्ट करेल असे दिसते आहे.