बागुल मित्र परिवारातर्फे ‘एक पणती शहिदांसाठी ‘उपक्रम
पुणे –
ज्यांच्या प्राणांच्या आहुतीमुळे आज आपल्या सर्वांचे जीवन प्रकाशमय आहे, अशा शहीद जवानांचे स्मरण आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवाळी पाडवा दिनी शहिद वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक कामटे यांच्या निवासस्थानी शेकडो पणत्या प्रज्वलित करून दिवाळीनिमित्त शहिदांचे स्मरण करण्यात आले .
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्रपरिवाराने या उपक्रमाचे आयोजन केले होते. शहीद अशोक कामटे यांचे पुत्र राहुल अशोक कामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थितीत पिंपळे निलख येथील कामटे यांच्या निवासस्थान परिसराची स्वच्छता करून रांगोळी साकारण्यात आली. शेकडो पणत्या प्रज्वलित करून शहीद जवानांचे स्मरण करण्यात आले. यावेळी पुणे नवरात्र महोत्सवाचे पदाधिकारी घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, सागर बागुल, हेमंत बागुल, अभिषेक बागुल, धनंजय कांबळे, ,इम्तियाज तांबोळी, पप्पू देवकर, गणेश पवार, गणेश खांडरे, गोरख मरळ, सोमनाथ कोंडे ,महेश ढवळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. संयोजक अमित बागुल म्हणाले अभू तपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर प्रतिकूल निसर्ग आणि अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता ‘छोडो मत उनको!’ असं म्हणत शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय सैन्याचे वीर जवान, पोलीस अधिकारी ! …पण शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांचे काय ?त्यांची दिवाळी कशी यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये. दिवाळीनिमित्त या कुटुंबियांसमवेत काही क्षण व्यतीत करावे आणि शहिदांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या अगोदर शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सातारा जिल्ह्यातील , चंदू चव्हाण यांच्या धुळे जिल्ह्यातील निवासस्थानी शौर्य गुढी उभारण्यात आलेली आहे ,असेही अमित बागुल म्हणाले.