पुणे- शहर जिल्हा मातंग समाज व दलित संघटनाच्यावतीने जळगाव येथील मातंग तरुणांची नग्न धिंड व विहीरीमध्ये पोहल्याने विहीर बाटली म्हणुन मातंग समाजाच्या दोन युवकांची नग्न करुन धिंड काढण्यात आली व त्यांना नग्नावस्थेत बेदम मारहाण करुन त्यांचा व्हीडीओ सोशल मीडियावर प्रसारीत केल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली . यावेळी मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले .
या घटनेतील आरोपीना कठोर शासन करण्याकरिता शासनाने प्रयत्न करून पीडित कुटुंबाचे पुनर्वसन त्वरित करावे , घटनेतील तपासात कसूर केल्याप्रकरणी संबधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून अट्रॉसिटी अक्टप्रमाणे गुन्हे दाखल करावेत , महाराष्ट्रातील दलितांवरील वाढलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात शासनाने कठोर भूमिका घेऊन दलितांवरील अन्याय अत्याचाराचे गुन्हे तात्काळ नोंदवून घेण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश देण्यात यावेत , सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने अट्रॉसिटी अक्ट शिथिल करण्यात आला आहे . त्यातील बदल रद्द करून तो कायदा पूर्ववत करण्याकरिता राज्य शासन व केंद्र शासनाने प्रयत्न करावेत . अशा मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या .
या निर्दशनामध्ये नगरसेवक अविनाश बागवे , प्रकाश वैराळ , अशोक जगताप , शंकर तडाखे, मालती अवघडे , भगवानराव वैराट , विष्णू कसबे , विठ्ठल थोरात , शाम देडे , विकास सातारकर , दादासाहेब सोनवणे , वसंतराव साळवे , अंकल सोनवणे , दत्ता जाधव , रवी आरडे , नारायण घोरपडे , सुदीप गायकवाड , संजय शेंडगे , भास्कर नेटके , संतोष घोलप , राकेश लोंढे , संजय भिमाले , राहुल डंबाळे , अमोल तुजारे , अशोक लोखंडे , अनिल हातागळे , सनी सोनवणे , प्रशांत फुले , बाळासाहेब मोहिते , दिनेश सकट , अतिश कापसे , गणेश लांडगे , सचिन इंगळे , सचिन देडे , सचिन पेटाडे , दयाभाऊ अडागळे , शैलेश मोरे , दीपक आवळे , मंगेश जाधव , संतोष कांबळे , सुखदेव वाघमारे , एकनाथ चांदणे , वसंत कांबळे , विनोद सोने , जितेंद्र भोसले , बाळासाहेब आवारे , अश्विन दोडके , रवी मोरे , निलेश वाघमारे , आनंद वैराट , सोमनाथ शिंदे , किशोर धगाटे , गणेश जाधव आदी मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते .