औरंगाबाद – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध केला म्हणून एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना भाजप नगरसेवकांनी शुक्रवारी जोरदार मारहाण केली
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यानंतर शुक्रवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध केला. त्यांनी विरोध करताच नगरसेवक राज वानखेडे, दिलीप थोरात, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे यांनी मतीन यांच्यावर धावून जात त्यांना जोरदार मारहाण केली. त्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर पिटाळून लावले. सय्यद मतीन यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या घटनेचे पडसाद थोड्याच वेळात शहरात उमटले. एमआयएमच्या काही कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर भाजप संघटन मंत्री भाऊराव देशमुख यांच्या गाडीची तोडफोड केली. एवढेच नाहीतर चालकालाही मारहाण केली. यामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे.
ही घटना संपूर्ण शहरात वार्यासारखी पसरली. घटनेनंतर मतीन यांचे समर्थक महापालिका मुख्यालयासमोर जमा झाले. तसेचभाजपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले. भाजप आमदार अतुल सावे यांच्यासह पदाधिकारी पोलिस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले असता मतीन यांच्या समर्थकांनी भाऊराव देशमुख यांची स्कार्पिओ गाडीवर दगडफेक केली. तसेच चालक विलास काशिनाथ गोराडे यांना बेदम मारहाणही केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून यांची बोराडे यांची टोळक्यातून सुटका केली. या घटनेमुळे शहरात तणाव पसरला आहे. शहरातील चौका-चौकांत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.