- झील फॅशन शोची सुरुवात दि. २ ऑगस्ट २०१९ पासून होणार असून ४ ऑगस्टला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
- या फॅशन शोमध्ये ३.५ ते ६० वयोगटातील मुले-मुली व महिला-पुरुष सहभागी होऊ शकतात.
पुणे-झील या सामाजिक संस्थेच्या वतीने सातव्या राज्यस्तरीय फॅशन शो चे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.हा कार्यक्रम पुण्यातील नामांकित पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पडणार असून याची सुरुवात दि. २ ऑगस्ट २०१९ पासून होणार असून ४ ऑगस्ट २०१९ ला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
पुण्याच्या कलाप्रेमींसाठी व त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या भव्य फॅशनशो चे आयोजन करण्यात आले आहे. या शो चे नाव ‘झील मिसेस, मिस, मिस्टर,टीन, किड्स महाराष्ट्र लेवल २०१९’ असे आहे.या फॅशन शोमध्ये ३.५ ते ६० वयोगटातील मुले-मुली व महिला-पुरुष सहभागी होऊ शकतात. हा शो तीन प्रकारात विभागला असून यात भारतीय राउंड, वेस्टन राउंड, व गाऊन राउंड आहेत.
या प्रसंगी बोलताना झीलच्या संस्थापक व संचालिका स्विटी गोसावी म्हणाल्या कि “सर्व सामान्यांना फॅशन जगतात पाऊल ठेवण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही या शो चे आयोजन करत असतो. पुणे शहरापासून सुरुवात केलेल्या हा शो सोलापूर, नाशिक व आता थेट ‘महाराष्ट्र’ लेवलच्या फॅशन शो चे आयोजन करण्यात आलेले असून पुढे हा शो राष्ट्रीय स्तरावन नेह्ण्याचे आमचे ध्येय आहे. या फॅशन शो मध्ये जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा.” असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
या प्रसंगी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट व क्लीनोप्त्राज च्या डायरेक्टर सौ. क्षमा धुमाळ बोलताना म्हणाल्या “झींल फॅशन शो चे आयोजन हे क्लीनोपात्राज ला मिळालेली एक संधी आहे. झील फॅशन शो अंतर्गत ४० ते ५० मेकअप आर्टिस्ट काम करणार असून या माध्यमातून अनेक मेकअप आर्टिस्ट प्रशिक्षणार्थी यांना स्वयंसिद्ध बनण्याची संधी मिळणार आहे. या फॅशन शो मध्ये सर्व मेक उप ३D व HD स्वरुपातील असणार आहेत, ,
यावेळी झीलच्या व्यवस्थापकीय विभागातील सौ. उर्मिला भोसले, सौ. रेवती लोंढे व श्री. परेश वैद्य तसेच ग्रुमर पिया रॉय उपस्थित होते. तसेच या शो च्या किड्स विभागाचे पारितोषिक राज म्युसिक अँड डान्स क्लास तर्फे देण्यात येणार आहेत.
या फॅशन शो मध्ये नाव नोंदणी करिता www.zeealfashionshows.com या संकेत स्थळावर संपर्क साधा किंवा अधिक माहिती करिता ८६००६७८१३३ या क्रमांकावर संपर्क करू शकता.