पुणे-कोणतेही आई वडील आपल्या अपत्याच्या तब्येती विषयी अतिशय हळवे असतात. मुलांना काही आजार झाल्यास व तो आजार अतिशय गंभीर आहे हे कळल्यावर आई वडिलांना धक्का बसतो. श्री व सौ गिरनाळे यांना असाच धक्का बसला जेव्हा त्यांना कळाले की त्यांच्या मुलाला दुर्धर असा यकृताचा विकार झाला आहे आणि तो यकृत प्रत्यारोपणा शिवाय तो बरा होणे शक्य नाही.
चि. अनुश याला बिलिअरी एस्ट्राशिया(Biliary Atresia)झाला होता, ज्यामुळे त्याची बिलिअरी ट्यूब अरुंद होऊन त्याचे यकृत निकामी झाले होते परिणामी त्याला दैनंदिन कार्य करण्यात अडचण येत असे. त्याच्या वयाच्या अन्य मुलांप्रमाणे तो त्याचे जीवन जगू शकत नव्हता. त्याचे पालक औरंगाबाद व पुणे येथील रुग्णालयात त्याच्या जन्मापासून उपचार करीत होते. त्यांनी त्याच्या उपचारावर खूप पैसे देखील खर्च केले होते व आर्थिकरित्या त्यांची परिस्थिती नाजूक बनली होती. ज्यावेळी त्यांना त्यांच्या मुलाच्या यकृत प्रत्यारोपण व त्यावर होणाऱ्या खर्चाविषयी कळले तेव्हा ते अजूनच खचले कारण त्यासाठी होणारा खर्च हा त्यांच्या परिस्थितीच्या बाहेरचा होता.
श्री व सौ गिरनाळे यांनी औरंगाबाद मध्ये ज्युपिटर हॉस्पिटल ची पेरिफेरल क्लीनिक ची जाहिरात पहिली.त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ.गौरव चौबळ आणि येथील यकृत प्रत्यारोपण टीम बद्दल माहिती मिळाली तसेच हॉस्पिटल मध्ये लहान मुलांच्या प्रत्यारोपणाच्या खर्चावर १०% सूट देखील मिळणार असल्याचे कळले. त्यांनी अनुशच्या यकृत प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला व त्यांना केवळ शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्चच द्यावा लागला. त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही..
यावेळी बोलताना ज्युपिटर हॉस्पिटल येथील एच.पी.बी लिव्हर ट्रान्सप्लांट, चीफ सर्जन डॉ गौरव चौबळ म्हणाले की, अनुशची आई सौ. गिरनाळे यांनी त्याला यकृत दान केले व दोघेही आता सुस्थितीत आहेत. लहान मुलांचे यकृत प्रत्यारोपण ही अतिशय कठीण गोष्ट आहे आणि त्यात अनुश ची अगोदर शस्त्रक्रिया झाली असल्याने हे काम अतिशय कठीण होते. हे प्रत्यारोपण करून आम्ही समाधानी आहोत
यावेळी बोलताना डॉ शरण नरुटे, एचपीबी व लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन म्हणाले की, जिवंत यकृत दाता म्हणजे दात्याच्या यकृताचा काही भाग रुग्णास दिला जातो. अनुशच्या आईला जेव्हा आपल्या मुलगा बरा होण्याची आशा दिसली तेव्हा त्या यकृत दानाकरीत लगेच तयार झाल्या.
ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये डॉ पारिजात गुप्ते, डॉ वैशाली, डॉ गौरव चौबळ, डॉ शरण नरुटे, डॉ पवन हंचनाळे, डॉ आदित्य नानावटी, डॉ सागर कक्कड व डॉ सेजल गराडे यांसाखे अनुभवी व तज्ज्ञ यकृत प्रत्यारोपण करणारे डॉक्टर आहे..
सौ रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या “फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावण्यास कटीबद्द आहेत. कोणत्याही मुलास वैद्यकीय कारणासाठी आर्थिक मदत हवी असल्यास आम्ही पुढे येतो. अशी कसलीही मदत करत असताना आम्ही धर्म व जात पाळत नाही माणुसकी हा एकाच धर्म आम्ही मानतो.”
यावेळी बोलताना अनुशचे वडील म्हणाले की, ज्युपिटर हॉस्पिटल, डॉ.गौरव चौबळ आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो. आज त्यांच्या मुळेच माझ्या मुलाला नवीन जीवन मिळाले आहे.