टाइम्स अॅण्ड ट्रेन्ड्स अकॅडमी तर्फे “व्हॉईस युअर आयडियाज” वर्कशॉप आयोजित
पुणे : टाइम्स अॅण्ड ट्रेन्ड्स अकॅडमी तर्फे “व्हॉईस युअर आयडियाज” वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता. हा वर्कशॉप दोन दिवसाचा होता .यावेळी या अकादमीचे संस्थापक आणि अध्यक्ष अमित अग्रवाल यांनी विद्यर्थ्यांना मार्गदर्शन केले . विद्यर्थ्या मध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांनी स्वतःमध्ये सकारात्मक विचार करावे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
प्रांतिक पनिगरांनीहि कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना हत्ती आणि मुंगी यांचे उदाहरण देउन विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून जीवनामध्ये आपली प्रगती करावी असे समजावून सांगितले .
टाईम्स आणि ट्रेंड अकादमीचे संस्थापक आणि अध्यक्ष अमित अग्रवाल म्हणाले, “केवळ प्रोफेशनल नव्हे तर वैयक्तिक यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास हा महत्त्वाचा मंत्र आहे. मी म्हणेन आत्मविश्वासांची कमतरता हि निष्क्रियतेला कारणीभूत आहे . विद्यर्थी आत्मविश्वासाच्या अभावी आपल्या जीवनातील उत्तम संधी गमावू शकतात. आणि म्हणूनच मी टीटीए विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला . जे त्यांना आपलीं कारकिर्द आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत करतील. “
टीटीए फेम हॉलमध्ये टाइम्स आणि ट्रेंड अकादमीने या कार्यशाळेचे आयोजन केले होते . कार्यशाळेची कल्पना विद्यार्थ्यांना आपल्या मनातील अनावश्यक भीती यावर मात करण्यास आणि त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी तसेच स्वतः:वर विश्वास ठेवण्यास मदत करणे हे मुख्य उद्देश होते .
या कार्यशाळेत अमित सरानी विद्यार्थीसाठी अनेक गट तयार केले . आणि जो गट विजयी होईल त्या त्या वेळेस त्या गटाला गुण देण्यात आले . आणि कायशाळेच्या शेवटच्या दिवशी ज्या गटाला जास्तीत जास्त गुण मिळाले होते त्या गटाला पारितोषिक देण्यात आले .
टाइम्स आणि ट्रेंड अकादमीतील इव्हेंट मॅनेजमेंट विद्यार्थ्यांतील व्यवस्थापक, आदिराज देशमुख म्हणाले, “ही एक उत्तम कार्यशाळा होती. श्रोत्यांच्या समोर बोलण्यासाठी मला समस्या होती त्यामुळे मला या कार्यशाळेची गरज होती. पण आता मला पूर्ण आत्मविश्वास आला आहे, आणि अमित सर यांनी दिलेल्या टिप्ससह, मी माझ्या तील कमतरता यावर मात करू शकतो . “
प्रांतिक पनिगरांनी कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी टीटीए विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली.
त्यांनी हत्ती आणि मुंगी यांचे उदाहरण दिले . जर लोक स्वतःवर विश्वास ठेवतील आणि सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतील, तर ते त्यांच्या आयुष्यात मार्ग बदलू शकतील आणि आपल्या जीवनात उत्तम गोष्टी साध्य करू शकतील. वर्कशॉप विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेबद्दल जाणीव करून देण्याच्या थीमवर केंद्रित होते.
प्रांतिक यांचे प्रशिक्षण क्षेत्र हे गोल सेटिंग , टीम वर्किंग, टाईम मॅनेजमेंट, इमोनल इंटेलिजन्स, लीडरशीप डेव्हलपमेंट, पॉवर ऑफ बिलीफस, आपण आपले जीवन यशस्वी करू शकता, पालकत्व, ताण व्यवस्थापन आणि संबंधित सॉफ्ट स्किल यासारख्या विषयांवर चर्चा केली .