पुणे-
नवी सांगवी , राजमाता गार्डन, कृष्णा चौक,साई चौक,फेमस चौक येथे संस्थेच्या वतिने प्रदुषन मुक्त दिवाळी साजरी होण्याकरीता पथनाट्य, कविता , माहिती पत्रके वाटुन जनजागृती केली. यात फटाक्यामुळे मानवी शरीरावर होणारे दुषपरीनाम पर्यावरणाची होत असलेली हानी जेष्ठ नागरीक, गर्बवती महिला लहान मुले यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परीनामाची माहिती कवितेतुन देण्यात आली, मोठ्या आवाजाचे फटाके वाजवील्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते याची माहिती देण्यात आली.याला नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला व स्वता होवून या जनजागृती किर्यक्रमात सहभाग घेतला.यावेळी संस्थेच्या वतिने स्वदेशी मालाचीच खरेदी करुन देश आपल्या राष्ट्रप्रगतीला हातभार लावावा तसेच चायनीच मालावर बहिष्कार टाकण्याचे आवहान संस्थेचे संचालक पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर , मुख्यसल्लागार अनिल कदम , सचिव सोमनाथ सावंत,संचालक तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा संजना कपुर सा.का. संगिता जोगदंड ,पि.चि.उपाध्यक्ष विकास शाहाने , दत्तात्रय घोरपडे, मुरलीधर , अँड. सचिन काळे ,जितेन जेतवान, सोमनाथ कोरे , अरविंद मांगले ,वसंत चटके,शोभा हेगडे, सदाशीव जाधव , हनुमंत पंडीत, एस.डी विभुते आदीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले.सदर कार्यक्रमात कवयत्री शोभा जोशी, सविता इंगळे, संगिता झिंर्जुके, कवी सुभाष गुंभरे आदीने कवितेतुन देशभक्ती व फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला. तसेच दहशतवादाला अश्रय देणाऱ्या पाकीस्तानला मदत करत असलेल्या चीनच्या मालावर बहिष्कार टाकुन स्वदेशीचा वापर करण्याचे आवहान कवीतेतुन करण्यात आले.