जुहू येथील आदर्श नवरात्री उत्सवात देवेंद्र फडणवीस, मधुरा व अभिजित साटम
पुणे-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुहू येथील अमित साटम आयोजित आदर्श नवरात्री उत्सवास उपस्थिती दर्शवून सोहोळ्याची शोभा वाढविली. प्रसंगी मुख्यामंत्र्यांनी सीएम चषक अंतर्गत ‘सेलिब्रेट अंधेरी’ या स्तुत्य उपक्रमाचे उदघाटन केले. सीएम चषक हा उपक्रम विविध प्रकारच्या क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून सुरु करण्यात आलेली योजना आहे. देवेंद्र फडणवीस सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देत म्हणाले की, “तुम्हा सर्वांस सुख-शांती, यश संपत्ती लाभो आणि आपल्या देशाची उत्तोमोत्तम प्रगती होवो अशी मी देवी चरणी प्रार्थना करतो.”
अभिनेत्री मधुरा वेलणकर व अभिनेता-निर्माता अभिजित साटम यांनि देखील आदर्श नवरात्री उत्सवास उपस्थिती दर्शवून सोहोळ्यास रंगत आणली.