17,500 फुटांवर लहानग्या आरव मंत्री (वय 11) व आस्था गाडेकर (वय 15) यांनी रचला इतिहास
नाशिक येथील डॉ. अविनाश व डॉ.स्मिता गाडेकर , शिवलाल मंत्री, बीड चा सुपुत्र शिवाजी महागोविंद, भारतीय सैन्यातील जवान दिग्विजय झावरे यांनी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला जगातील सर्वात अवघड ट्रेक.
यती (हिममानव) बद्दल टीमने बनवली महत्वाची शॉर्टफिल्म.
पुढील वर्षी “माउंट एव्हरेस्ट-2020″ चे आयोजन
सोलापूर(प्रतिनिधी): एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी स्थापन केलेल्या 360 एक्सप्लोरर मार्फत आयोजित केलेल्या एव्हरेस्ट बेसकॅम्प मोहिमेत अतिशय लहान मुलांनी ही मोहीम पूर्ण करत इतिहास घडवला आहे. आरव मंत्री (वय 11) व आस्था गाडेकर ( वय 15) अशी या लहानग्यांची नावे असून नुकताच चर्चिला गेलेला “हिममानव (यती)” याच्याबद्दल एक फिल्मही टीमने बनवली आहे.
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी दरवर्षीप्रमाणे एव्हरेस्ट बेसकॅम्प मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेचे संपूर्ण नेतृत्व आनंद यांनी केले होते. नाशिक, सोलापूर, अहमदनगर, बीड या जिल्ह्यातील लोक या मोहिमेत सहभागी झाले होते. नाशिक येथील प्रसिध्द डॉक्टर डॉ. अविनाश व स्मिता गाडेकर, शिवलाल मंत्री, अहमदनगर येथील दिग्विजय झावरे, बीड येथील शिवाजी महागोविंद यांनीही यशस्वीपणे 17,500 फुटांवर आरोहण करून यश मिळवले.
पुढील वर्षी “एव्हरेस्ट-2020″
पुढील वर्षी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली “माउंट एव्हरेस्ट” मोहिमेचे आयोजन केले जाणार असून ही मोहीम विश्वविक्रमी ठरणार आहे. ज्यांचे एव्हरेस्ट चढाईचे स्वप्न आहे त्यांनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी 9067045500 / 9067035500 या नंबरवर संपर्क करावा. अत्यंत कठीण अश्या चाचणीतुन या मोहिमेसाठी निवड केली जाणार आहे.
आरव मंत्री ( गिर्यारोहक)
“लहानपणापासुन आई-वडिलांनी मला गड किल्ले चढाईची आवड लावली. एव्हरेस्ट मोहिमेवर आनंद सर व 360 एक्सप्लोरर मधून केलेल्या मार्गदर्शनामुळे ही मोहीम पूर्ण होऊ शकली”
आस्था गाडेकर ( गिर्यारोहक)
“या मोहिमेत मला खूप शिकायला मिळाले. एव्हड्या दिवस पुस्तके वाचली, फिल्म पहिल्या पण एव्हरेस्ट बेसकॅम्प ट्रेक चा अनुभव या पेक्षा खूपच वेगळा होता. उंचीवर शरीरामध्ये होणारे बदल मला शिकता आले. 360 एक्सप्लोरर चे अतिशय सुंदर नियोजन होते”