अमित शहा घेत आहेत सुरत लुटल्याचा बदला … माजी महापौरांचा घणघणाती आरोप (व्हिडीओ)
पुणे- छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचा अपमान आणि राग धरून अजूनही त्याचा बदला घेण्याच्या दृष्टीने मराठा बहुजन नेत्यांना आणि छत्रपतींच्या वंशजांना मांडलिक बनविण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप करत.. जे त्यावेळी तलवारींनी गुजरात च्या राजकीय धुरिणांना जमले नाही ,जे मुंबई महाराष्ट्रा पासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई ना जमले नाही .ते जमविण्याचे षड्यंत्र भाजपचे नेते म्हणजे पंतप्रधान मोदी,तसेच अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्न करत असल्याचा आरोप हि पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी येथे केला आहे. ते म्हणाले ,गुजरातच्या जनतेत हा राग नाही तर तेथील मुठभर राजकीय धुरिणांमध्ये हा महाराष्ट्राबद्दलचा संताप कायम असल्याचेच जाणवते आहे.
अनेक मराठा आणि बहुजन समाजाचे नेते, तसेच छत्रपतींचे वंशज भाजप मध्ये जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आपले मत ‘माय मराठी ‘कडे मांडताना पहा नेमके ते काय म्हणाले ….