पुणे- कधी काळी ज्यांना राजकीय स्पर्धक मानले जात ,शरद पवारांचा नेमका वारस कोण ? अशा प्रश्नाने भुवया उंचावून दादा ताई च्या नात्याला संकटात गोवणारे वातावरण झालेले अनेकांना आठवत असेल . पण जावू द्यात … सध्या तरी या भावा बहिणीत कमालीचा म्हणजे असावा तसा गोडवा आहे हि मराठी माणसासाठी एक चांगली बातमी म्हणता येईल असाच गोडवा कायम प्रत्येक भावा बहिणीत नांदावा अशी हि इछ्या व्यक्त करता येईल .
अजितदादा -सुप्रिया ताई ची भाऊबीज एफबी वरून त्यांच्या चाहत्यांपर्यंत …पोहोचली आहे .
देशभरात आज भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही बारामतीमध्ये आज भाऊबीज साजरी केली.दीपोत्सवाच्या प्रकाशमयी उत्सवात बहीण-भावांतील नाते उजळवणारा सण भाऊबीज…!! सर्वांना स्नेहमयी शुभेच्छा.!! अशा वाक्यासह भाऊबीजेचा फोटो सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर शेअर करुन सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एकुलती एक कन्या आहेत. तर अजित पवार सुप्रिया सुळेंचे चुलत भाऊ आहेत. दरम्यान, पवार कुटुंब सगळे सण बारामतीमधील ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी साजरे करतात. यंदा पवार कुटुंबाने दिवाळी बारामतीमध्ये एकत्र साजरी केली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची,आणि नागरिक व पत्रकारांची शरद पवार यांनी आस्थेने विचारपूस केली आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या.