पुणे-” दारुंबदी” पुण्यासह राज्यात दारुंबदी साठी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र,चंदन नगर यानी चालु केलेल्या मोहिमेला येरवडा येथील आंबेडकर चौक येथे जोरदार प्रतिसाद मिळालाउपस्थित महिला,तरुण,जेष्ट नागरिकानी जोरदार ” दारुंबदी” झालीच पाहिजे या घोषणा दिल्या व स्वाक्षरी करुन या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी पुण्याचे उपमहापौर डॉ सिध्दार्थ धेंडे,नगर सेविका अश्विनी लांडगे आनंदवन संस्थेचे अध्यक्ष डॉ अजय दुधाणे उपस्थित होते डॉ अजय दुधाणे म्हणाले प्रयंत्नातुन हि मोहिम सुरु राहणार आहे. आता पुढील रविवारी येरवडा येथे गाडीतळापासुन पदयात्रा काढण्यात येणार आहे. याप्रसंगी स्थानिक कार्यकर्ते,संपतराव पोळ,वैभव पवार,शैलेंद्र भोसले,आनंद रसाळ, विपुल रोकडे,विक्रांत भोसले,अनिरुध्द हळंदे ,विशाल काकडे,भिमसिंग गायकवाड,सिध्दार्थ कांबळे,महेश वाडेकर ,विवेक कदम,प्रकाश धिडे,प्रमोद शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती