शरद पवारांनंतर कोण या वरून वाद – खा. संजय काकडे यांचे मत (व्हीडीओ)
पुणे- आपल्या कुटुंबात कोणताही कलह नसल्याचे शरद पवार आणि अजीत पवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान शरद पवार आणि अजीत पवार यांच्या भोवती दिवसभर राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये चर्चा होत असताना भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी यासंदर्भात आपले मत काही माध्यमांपुढे व्यक्त केले आहे .अजीत पवार यांनीही आपली भूमिका मुंबईतील पत्रकार परिषदेतून स्पष्ट केली आहे .
मात्र शरद पवारांच्या नंतर पक्ष नेतृत्व कोणाकडे यावरून होणाऱ्या अंतर्गत कलहातून अजीत पवार यांनी राजीनामा दिला असावा असे आपले मत असल्याचे खा. संजय काकडे यांनी म्हटले आहे . बाकी वक्तव्ये हि सारवासारव आणि खोटी -नौटंकी सारखी आहेत असे हि ते म्हणाले ..पहा आणि ऐका नेमके खासदार संजय काकडे काय म्हणाले त्यांच्याच शब्दात ….