पुणे, 15 ऑक्टोबर 2019 – चाहते आणि स्टार्सना एकत्र आणण्याच्या आश्वासनासह भारतातील आघाडीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हेलोतर्फे स्टारफॅन मीटअपच्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले होते. या मीटअपमुळे चाहत्यांना ट्रिपल सीट या रोमँटिक सिनेमातले त्यांच्या आवडीचे स्टार्स म्हणजे अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांना भेटण्याची संधी मिळाली. दिग्दर्शक संकेत पावसेही स्टारकास्टबरोबर उपस्थित होते. हा सिनेमा 24 ऑक्टोबर 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेलोनेने आपल्या युजर्सना त्यांच्या पसंतीच्या भाषेत व्यक्त होण्यासाठी, त्या भाषेतल्या कंटेंटचा आनंद घेण्यासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारतात 14 भाषांत उपलब्ध असलेले हेलो युजर्सना वेगवेगळ्या संकल्पना आणि विभागातील ट्रेंडिंग तसेच लोकप्रिय कंटेंट उपलब्ध करून देते. स्टारफॅन मीटअप हा हेलोच्या युजर्सना त्यांच्या आवडीच्या स्टारबरोबर कनेक्ट होण्याची व त्यांच्या आयुष्याबद्दल आणखी जाणून घेण्याची संधी देणारा उपक्रम आहे.
पुण्यात ट्रिपल सीटच्या कलाकारांबरोबर झालेल्या भेटीच्या कार्यक्रमात चाहत्यांना मराठी सिनेअभिनेता, स्क्रीनरायटर, संचालक, निर्माता आणि रंगमंच कलाकार असलेल्या अंकुश चौधरीचे आयुष्य कसे असते हे जाणून घेता आले. अंकुश 1995 मध्ये सूना येती घरा या मराठी सिनेमातून उदयास आला. सिनेमाइंडस्ट्रीत यशाच्या पायऱ्या चढत त्याने बरेच सिनेमे केले. आदित्य सरपोतदार यांच्या क्लासमेट्स या पहिल्या सिनेमात त्यानं सत्या नावाच्या कॉलेज तरुणाची भूमिका साकारली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला आणि तो 2015 मधील अंकुशचा पहिला हिट सिनेमा ठरला.
चाहत्यांशी संवाद साधताना शिवानी सुर्वेनं या सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव मांडला. ती स्टार प्लसवरी जाना ना दिल से दूर मालिकेतील विविधा या भूमिकेसाठी तसेच स्टार प्रवाहवरील देवयानी मालिकेतील देवयानीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.
क्लासमेट्स या सिनेमातून पर्दापण करणाऱ्या अभिनेत्री पल्लवी पाटीलनेही तिचा अनुभव चाहत्यांशी शेयर केला.
हेलोतर्फे आयोजित केला जाणारा स्टारफॅन हा कार्यक्रम चाहते व कलाकारांमधली दरी दूर करतोच, शिवाय चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रेटीला प्रत्यक्षात भेटण्याची संधी देतो. स्टारफॅन भेटीचे पहिले दोन कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आले होते. तेव्हा चाहत्यांना अभिनेत्री, नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्दर्शक प्रियांक शर्मा व प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांना भेटण्याची संधी मिळाली होती.
हेलोबद्दल
हेलो हा ग्लोबल देसीजसाठी बनवण्यात आलेला आघाडीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. सर्वांना एकत्र आणून त्यांना स्वतःच्या भेषत संवाद कंटेंटची निर्मिती करण्याची व तो शेयर करण्याची संधी देणे तसेच त्यांना अधिक मोठ्या समाजाशी जोडणे हे हेलोचे मिशन आहे. हिंदी, तमिळ, मल्याळम अशा 14 भारतीय भाषांत उपलब्ध असलेले हेलो 2018 मध्ये गुगल प्ले स्टोअरवर सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेल्या अप्सपैकी एक आहे. हेलो भारत तसेच अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, सौदी अरेबिया, युएई, ओमान, कुवैत, कतार, नेपाळ, श्री लंका, दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेशमध्ये अँड्रॉइड व आयओएसवर उपलब्ध आहे.