टीआरएच्या भारतातील सर्वात आकर्षक ब्रँड – भारतातील पाहणी 2018 यावर आधारित
मुंबई: भारतातील 16 शहरांतील 5,000 ब्रँडचा समावेश करणाऱ्या पाहणीमध्ये, 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या ‘महिंद्रा’ ट्रॅक्टर्सला ट्रस्ट रिसर्च अॅडव्हॉयजरीने (टीआरए)‘भारतातील सर्वात आकर्षक ब्रँड्स’ – भारतातील पाहणी 2018 या अहवालाच्या पाचव्या आवृत्तीमध्येभारतातील सर्वात आकर्षक ट्रॅक्टर ब्रँड म्हणून गौरवण्यात आले आहे. ही पाहणी टीआरएच्या प्रोप्रायटरी ‘ब्रँडअॅट्रॅक्टिव्हनेस मॅट्रिक्स’ वर आधारित असून, त्यामध्ये ब्रँड अॅट्रॅक्टिव्हनेसची 36 वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.
टीआरए पुरस्कार मिळाल्याबद्दल, एमअँडएम लि.चे फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष राजेश जेजुरीकर म्हणाले, “टीआरए पुरस्कार म्हणजे, शेतीच्या प्रच्येक प्रकारच्या उपयोगासाठी विविध प्रकारचे ट्रॅक्टर उपलब्ध करण्याबरोबरच, जागतिक ग्राहक-केंद्री ब्रँड निर्माण करण्याच्या आमच्या कामाचा गौरव आहे. महिंद्रामध्ये आम्ही यशस्वी होण्यासाठी सातत्याने ग्राहकांबरोबर काम करण्याचा आणि त्यांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. या पुरस्कारासाठी टीआरएचे आभार मानत असताना, आम्ही यापुढेही ट्रॅक्टर व फार्म मशीनरी या दोन्ही क्षेत्रांमध्ये नवी उत्पादने विकसित करण्यासाठी काम करत राहणार आहोत. त्यासाठी नावीन्य व तंत्रज्ञान यावर भर देणार आहोत”.
टीआरए रिसर्चचे रिसर्च डायरेक्टर सचिन भोसले यांनी सांगितले, “ब्रँड आकर्षक ठरण्यासाठी महिंद्रा ट्रॅक्टर्स कम्युनिकेशन महत्त्वाची दुहेरी भूमिका बजावत आहे. एक म्हणजे, यामुळे ब्रँडमधील आकर्षकपणा उठून दिसतो, आणि दुसरे म्हणजे, हा आकर्षकपणा भारतातील शेती क्षेत्रातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली जाते. महिंद्रा म्हणजेच ट्रॅक्टर असे समीकरण झाले आहे आणि एक ब्रँड म्हणून तो सर्व भारतीय ट्रॅक्टर ब्रँडमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या यशासाठी महिंद्राचे अभिनंदन.”
टीआरएचा ‘बाइंग प्रॉपेन्सिटी’ निर्देशांक ही शास्त्रीय पद्धत असून, तो ग्राहकांची उत्सुकता समजून घेण्यासाठी व मोजण्यासाठी ग्राहकांच्या खरेदी प्रक्रियेच्या मुळाशी जातो. ग्राहकांच्या प्रभावाबाबतच्या खरेदीला चालना देणाऱ्या ओव्हर्ट, कव्हर्ट व काँटेक्शुअल घटकांद्वारे हा निर्देशांक हे समजून घेतो. बाइंग प्रॉपेन्सिटी निर्माण करणे म्हणजे, ब्रँडविषयी ग्राहकांचा नैसर्गिक कल निर्माण करणे व हा कल ग्राहकाच्या विश्वासाच्या (खरेदी करण्यासाठी व्यवहारात्मक चालनादायी घटक) व आकर्षकपणाच्या (खरेदी करण्यासाठी मानसिक-सामाजिक-सांस्कृतिक चालनादायी घटक) आधारे निर्माण केला जातो.
महिंद्राविषयी
20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे.त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.