भुवनेश्वर: आयसीआयसीआय बँकेने ओडिशातील फनी चक्रिवादळाचा तडाखा बसलेल्या परिसरामध्ये मदतकार्य व सहकार्य उपलब्ध करण्यास राज्य सरकारला व स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी 10 कोटी रुपये दिल्याचे आज जाहीर केले. या योगदानातील बहुतांश रक्कम मुख्यमंत्री मदतनिधीसाठी देण्यात आली आहे. बँकेने मदतकार्यासाठी जिल्हा स्तरावरही मदत दिली आहे.
याबरोबरच, वादळाचा फटका बसलेल्या राज्यातील अन्य भागांतील ग्राहकांना मदत करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेने विविध उपाय जाहीर केले आहेत. चक्रिवादळाचा तडाखा बसलेल्या ग्राहकांना गृह, वाहन व वैयक्तिक अशा रिटेल कर्जांचा मे महिन्यातील ईएमआय भरण्यास विलंब झाल्यास बँक त्यावरील दंड माफ करणार आहे. तसेच, या महिन्यात क्रेडिट कार्डावरील थकबाकी भरण्यास विलंब झाल्यास दंड आकारला जाणार नाही व चेक बाउन्स झाल्यासही शुल्क आकारले जाणार नाही.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सांगितले, “ओडिशाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आम्ही आयसीआयसीआय बँकेचे आभारी आहोत. आयसीआयसीआय बँकेने राज्यातील मदतकार्यासाठी व पुनर्वसनासाठी 10 कोटी रुपयांची मदत दिली आहे.”
राज्यातील परिस्थितीविषयी बोलताना, आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, “अशा संकटाच्या वेळी आमच्या प्रार्थना व ओडिशातील रहिवाशांच्या पाठीशी आहेत. आयसीआयसीआय बँकेमध्ये आम्ही ओडिशातील लोकांना मदत करण्यासाठी आणि आमच्या स्वतःच्या उपक्रमांद्वारे आणि राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्या सहयोगाने त्यांना या नैसर्गिक संकटातून बाहेर येण्यास मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”