मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम) या 20.7 अब्ज डॉलरच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने, अलीकडेच दाखल करण्यात आलेल्या स्टायलिश व थरारक XUV300 या कॉम्पॅट एसयूव्हीसाठी 13,000 बुकिंग करण्यात आल्याचे आज जाहीर केले.
आज, एसयूव्ही उद्योगामध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे प्रमाण 40% आहे आणि गेल्या 5 वर्षांमध्ये झपाट्याने वाढणारी श्रेणी आहे.
बुकिंगविषयी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे सेल्स व मार्केटिंग प्रमुख वीजय राम नाकरा यांनी सांगितले, “XUV300ला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्हीसारख्या अत्यंत स्पर्धात्मक श्रेणीमध्ये 15 ते 20% हिस्सा मिळवण्याच्या आमच्या उद्दिष्टानुसार, आम्ही पहिल्याच महिन्यात 13,000 हून अधिक बुकिंग मिळवली आहेत व आम्ही आघाडीच्या 3 मध्ये स्थान मिळवले आहे. तसेच, ग्राहकांनी XUV300 ला पसंती दर्शवली असल्याचे अधोरेखित केले आहे. 75% हून अधिक बुकिंग हे XUV300च्या टॉप एंड प्रकारांसाठी झाले आहे, हेही उल्लेखनीय आहे.”
या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रतीक्षेच्या असणाऱ्या XUV300ने, आकर्षक, चित्त्यापासून प्रेरित डिझाइन, थरारक कामगिरी, सुरक्षेची या श्रेणीतील सर्वोत्तम वैशिष्ट्ये व उत्कृष्ट इंटिरिअर या वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांकडून व ऑटो तज्ज्ञांकडून मोठी पसंती मिळवली आहे. XUV300 ला आतापर्यंत 2.5 हून अधिक लीड्स मिळाल्या आहेत.
महिंद्राविषयी
20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.