पणजी – गोवा टुरिझमने १३ मार्च २०१९ रोजी लिस्बन, पोर्तुगाल सुरू झालेल्या बीटीएलमध्ये (बोल्सा दे टुरिझ्मो दे लिस्बोओ) प्रभावी सादरीकरण केले. १३ मार्च रोजी सुरू झालेल्या या पाच दिवसीय कार्यक्रमाला बाजारपेठेतील लीडर्सनी आपल्या स्टँडचा आकार वाढवत चांगला प्रतिसाद दिला असून त्याला जागतिक व भारतीय पर्यटन बाजारपेठेतील प्रतिनिधींच्या सहभागाची जोड मिळाली होती.
पोर्तुगालच्या माननीय राजदूत श्रीमती के नंदिनी सिंग्ला यांनी श्री. संजीव गडकर, संचालक, पर्यटन विभाग, गोवा सरकार यांच्या नेतृत्वाखालील गोवा टुरिझम प्रतिनिधी मंडळाला आणंत्रित केले. श्रीमती सिंग्ला यांनी बोल्सा दे टुरिझ्मो दे लिस्बोओमधील गोवा टुरिझमच्या सहभागाबद्दल आणि गोवा टुरिझमतर्फे साजर करण्यात आलेल्या आकर्षक व प्रभावशाली पॅव्हेलियनबद्दल आनंद व्यक्त केला.
श्रीमती सिंग्ला यांनी गेल्या वर्षी गोव्याला भेट देऊन माननीय पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर यांची भेट घेतली होती. त्यांनी परत एकदा गोवा टुरिझम प्रतिनिधीमंडळास पूर्ण पाठिंबा देत गोवा व पोर्तुगालमधील द्विपक्षीय संबंध क्रीडा, पर्यटन व इतर क्षेत्रांद्वारे जपण्याचा मानस व्यक्त केला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून श्रीमती सिंग्ला यांनी गोवा टुरिझमला एपीएव्हीटी या पोर्तुगीज पर्यटन संस्थांच्या संघटनेसोबत संवाद प्रस्थापित करून नजीकच्या भविष्यात गोव्यातील पर्यटकांची संख्या वाढवण्याची सूचना केली.
श्री. जोसे युलिसेस कोरिया ई सिल्व्हा, केप वर्देचे माननीय पंतप्रधान यांनीही सध्या लिस्बनमध्ये सुरू असलेल्या बीटीएलमधील गोवा टुरिझमच्या पॅव्हेलियनला भेट देत विविध वैशिष्ट्यांनी युक्त अशा गोव्याच्या पर्यटनात रस दाखवला. त्यांनी दोन्ही प्रदेशांत पर्यटनाची देवाणघेवाण करत द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली.श्री. दीपक नार्वेकर, जनसंपर्क अधिकारी आणि श्री. गजानन महाले, एटीओ- पर्यटन खाते हे ही या चर्चेप्रसंगी उपस्थित होते.
गोवा टुरिझमने बीटीएल, लिस्बन येथे आकर्षक पॅव्हेलियन प्रस्थापित करून तेथे आपली सर्व पर्यटन उत्पादने आणि सेवा, पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद व सादरीकरणाचे आयोजन केले होते. त्याला आंतरराष्ट्रीय खरेदीदार, सहल संचालक, प्रवासी एजंट्स, वेडिंग प्लॅनर्स, कॉर्पोरेट ट्रॅव्हल डिसीजन मेकर्स, हॉस्पिटॅलिटी, लीझर आणि प्रवास क्षेत्रातील संभाव्य गुंतवणूकदार यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
काही ब्लॉगर्स आणि प्रवास लेखकांनी बीटीएलला भेट देत गोवा टुरिझम सेवा व इतर सुविधांची माहिती घेतली. गोवा टुरिझम अधिकारी या कार्यक्रमाअंतर्गत प्रसिद्ध सहल संचालकांशी बीटुबी बैठकी आणि नेटवर्किंग करत आहेत. कित्येक ब्लॉगर्सनीही गोवा स्टॉलला भेट दिली. यावेळेस आयोजित करण्यात आलेल्या गोवा इव्हनिंगला पर्यटन क्षेत्रातील ऑपरेटर्स, मीडिया, प्रेक्षक व इतर मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. गोवा पॅव्हेलियनचे आरेखन आणि व्यवस्थापन एएमओचे श्री. एल्व्हिस डायस यांनी केले होते.