38 हून मॉडेल असणाऱ्या, नव्या एअर कंडिशनरमध्ये केवळ सर्वात पर्यावरणपूरक रेफ्रिजरंट्सचा वापर – ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शिअल सर्वात कमी असणारे R290 व R32
~ ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शिअल सर्वात कमी असणाऱ्या R290 या जगातील सर्वात हरित रेफ्रिजरंटचा वापर करणारा भारतातील एकमेव एसी उत्पादक
~ आगामी उन्हाळ्यामध्ये एसी श्रेणीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% वाढ करण्याचे उद्दिष्ट
मुंबई – ब्रँडच्या ‘सोच के बनाया है’ या विचारसरणीनुसार आणि पर्यावरण या ब्रँड मूल्यानुसार, गोदरेज अप्लायन्सेस या होम अप्लायन्सेस उद्योगातील एका आघाडीच्या कंपनीने विविध प्रकारचे पर्यावरणपूरक एअर कंडिशनर दाखल केले. नव्या एसींमध्ये 38+ मॉडेलचा समावेश असून, त्यामध्ये R290 व R32 या सर्वात पर्यावरणपूरक रेफ्रिजरंटचा वापर करण्यात आल्याने ही एसी सर्वात कमी ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शिअल (जीडब्लूपी) असणार आहेत.
नासा गिसच्या मते, सन 1880 पासून जागतिक तापमान दरवर्षी 1.9F या प्रमाणात वाढते आहे. आजवर नोंदवण्यात आलेल्या सर्वात उष्ण वर्षांमधील 18 वर्षे केवळ 2001 या वर्षानंतरच्या वर्षातील आहेत. येणारा प्रत्येक उन्हाळा अगोदरच्या वर्षातील उन्हाळ्यापेक्षा उष्ण असतो. ग्रीन हाऊस गॅसच्या उत्सर्जनात वाढ होत असल्याने हवेमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते व त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये वाढ होते. हवामानातील बदलांबद्दल चर्चेमध्ये भारतही केंद्रस्थानी आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड विचारात घेता, ग्लोबल वॉर्मिंगवरील व हवामानातील बदलांवरील परिणाम यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
पर्यावरणाप्रती असणाऱ्या ब्रँडच्या दीर्घकालीन बांधिलकीच्या अनुषंगाने, गोदरेज अप्लायन्सेसने जास्तीत जास्त कूलिंग देण्यासाठी, पण पर्यावरणावर कमीत कमी परिणाम करण्यासाठी नवे एअर कंडिशनर दाखल केले आहेत. हरित हे वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवून, नव्या गोदरेज एसीच्या मालिकेत केवळ R290 व R32 रेफ्रिजरंटचा वापर केला आहे. या दोन्ही रेफ्रिजरंट्समध्ये ‘झीरो ओझोन डिप्लिशन पोटेन्शिअल (ओडीपी)’ आहे, त्यामुळे पृथ्वीच्या ओझोन स्तराला हानी पोहोचवली जात नाही, त्यामुळे पृथ्वीचे व तिच्या वातावरणाचे सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून संरक्षण केले जाते. दुसरे म्हणजे, या रेफ्रिजरंट्समध्ये ‘लोएस्ट ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शिअल’ असून R290 मध्ये ते केवळ 3 आहे आणि R32 मध्ये केवळ 675 आहे, या तुलनेत अन्य रेफ्रिजरंट्समधील जीडब्लूपी 1810 व त्याहून अधिक आहे.
विविध प्रकारच्या गोदरेज एसींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये समाविष्ट असून ती उत्तम कूलिंग देतात. गोदरेज एसींमध्ये अचूक कूलिंगसाठी इन्व्हर्टर तंत्रज्ञान आहे, कार्यक्षमपणे चालण्यासाठी ट्विन रोटरी कॉम्प्रेसर आहे, सुलभ देखभालीसाठी स्मार्ट आयओटी एनेबल्ड डायग्नॉसिस आहे, उत्पादनाचा सुरळित वापर करता येण्यासाठी इव्हॅपोरेटर व कंडेन्सर यावर अँटि कोरोसिव्ह ब्लु व गोल्ड फिन कोटिंग आहे, सायलेंट ऑपरेशनसाठी बहुस्तरीय अॅकॉस्टिक जॅक्ड आहे, हवेच्या शुद्धिकरणासाठी अॅक्टिव्ह कार्बन, अँटि-बॅक्टेरिअल व अँटि-डस्ट फिल्टर आहेत, सोयीस्कर इन्स्टॉलेशनसाठी 30 मीटरपर्यंत लांब पायपिंगची सुविधा आहे, तसेच यातून एसीची हेव्ही ड्युटी कूलिंग क्षमताही दिसून येते. या आणि आणखी काही वैशिष्ट्यांमुळे हे उपकरण ग्राहकांना उपयुक्त ठरेल, अशा नावीन्याचा विचार करून बनवले असल्याचे अधोरेखित होते. गोदरेज एसींबरोबर सर्व इन्व्हर्टर कॉम्प्रेसरसाठी 10 वर्षांची वॉरंटी मिळेल व अन्य कॉम्प्रेसरवर 5 वर्षांची वॉरंटी मिळेल. R290 रेफ्रिजरंट असणाऱ्या एसींमधअये कंडेन्सरवर आणखी 5 वर्षांची वॉरंटी मिळेल.
उन्हाळ्याच्या काळात एसी अधिक आकर्षक ठरण्यासाठी, गोदरेजने मर्यादित कालावधीसाठी काही ऑफर जाहीर केल्या आहेत, सर्व स्प्लिट एसींवर 499 रुपये + जीएसटी यामध्ये सर्वसाधारण इन्स्टॉलेशन आणि त्याच दिवशी इन्स्टॉलेशन करण्याची सोय, सर्व उत्पादनांसाठी आकर्षक फायनान्स ऑफर व कॉपर कंडेन्सर असणाऱ्या सर्व एसींवर 5 वर्षांची सर्वंकष वॉरंटी.
गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड व कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी याविषयी बोलताना म्हणाले, “उत्तम जीवनशैलीचे गोदरेजचे आश्वासन प्रत्यक्षात साकारत, ग्राहकांना नावीन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण व हरित तंत्रज्ञान देण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो, तसेच त्याच वेळी पर्यावरणाबदद्लची आमची बांधिलकीही जपली जाते. जगामध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञान सादर करण्याची प्रवर्तक असणारा गोदरेज अप्लायन्सेस हा निवासी एअर कंडिशनर श्रेणीमध्ये R290 या जगातील सर्वात हरित रेफ्रिजरंटचा वापर करणारा पहिला ब्रँड आहे. R290 रेफ्रिजरंट असणारे एसी व्यावसायिक उद्देशाने निर्माण करणे, इन्स्टॉल करणे व सर्व्हिसिंग करणे, या बाबतीतल क्षमतेला युनायटेड नेशन्सनेही (यूएनईपी) नावाजले आहे. एक जबाबदार कंपनी म्हणून, आम्ही अप्रतिम उत्पादने तयार करण्यासाठी वर्षागणिक अधिकाधिक प्रयत्न करत आहोत. 0 ओडीपी व सर्वात कमी डीडब्लूपी असणारे नवे गोदरेज एसी हे कूलिंग यू अँड द प्लॅनेट याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.”
गोदरेज अप्लायन्सेसचे प्रॉडक्ट ग्रुप हेड संतोष सालिअन यांनी सांगितले, “एअर कंडिशनरसारखी उपकरणे ग्रीन हाउस गॅसेस सोडत असल्याने ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आणखी वाढते. देशाचे शाश्वततेचे उद्दिष्ट विचारात घेऊन, आम्ही 38 नवी गोदरेज एसी मॉडेल दाखल करत आहोत – लोएस्ट ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शिअल असणारे भारतातील सर्वात पर्यावरणपूरक एसी. या नव्या एसीमध्ये जगातील सर्वात हरित रेफ्रिजरंट R290 आणि R32 यांचा वापर केला असून, त्यामुळे ओझोनमध्ये घट होण्याची शक्यता शून्य झाली आहे व ग्लोबल वॉर्मिंग होण्याची शक्यताही कमीत कमी आहे. उदा. 1810 जीडब्लूपी असणाऱ्या R22 रेफ्रिजरंटने 1 वर्ष सोडलेल्या ग्रीनहाउस गॅसचा परिणाम नाहीसा करण्यासाठी अंदाजे 49 झाडे लावावी लागतील, तर या तुलनेत, R290 रेफ्रिजरंट असणाऱ्या 5-स्टार एसीसाठी केवळ 29 झाडे लागतील. ग्रीन इन्व्हर्टर टेक्नालॉजी असो किंवा ब्लु फिन अँटि कोरोजन संरक्षण असो किंवा स्मार्ट आयओटी एनेबल्ड डायग्नॉसिस किंवा ट्विन मोटर रोटरी कॉम्प्रेसर असो, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे व तंत्रज्ञानामुळे हे एसी शक्तिशाली कूलिंग देतात, उर्जेचा वापर कमी करतात व कमीत कमी ग्लोबल वॉर्मिंग करतात. 5-स्टार श्रेणीतील एसी अंदाजे 30% असून, या पर्यावरणपूरक एअर कंडिशनरच्या वापराने ग्राहक व पर्यावरण या दोन्हींना फायदा होईल, याची दक्षता आम्ही घेतली आहे.”
गोदरेज अप्लायन्सेसचे नॅशनल सेल्स हेड संजीव जैन म्हणाले, “ही विविध प्रकारची पर्यावरणपूरक उत्पादने सर्व माध्यमांतूनव आघाडीच्या स्टोअर्समध्ये उपलब्ध केली जातील. दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढते आहे, हे आपण सर्वजण जाणतो आणि आगामी उन्हाळाही यासाठी अपवाद नसणार आहे. गेल्या वर्षी एसी उद्योगाची नकारात्मक वाढ झाली असली तरी या वर्षी वाढीला चालना मिळेल आणि आगामी हंगामात एसींसाठी चांगली मागणी असेल, अशी अपेक्षा आहे. नव्या एसींच्या 38 मॉडेलद्वारे आमचे स्थान अधिक बळकट होईल आणि या आर्थिक वर्षात 20% वाढेल, असा विश्वास आहे.”
एसीच्या बाबतीत सर्व्हिस हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका स्वतंत्र संशोधनामध्ये, गोदरेज स्मार्टकेअर या गोदरेज अप्लायन्सेसला पहिल्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले. गोदरेज स्मार्टकेअरद्वारे 660 सर्व्हिस सेंटरचे आणि 4500 हून अधिक स्मार्टबडी टेक्निशनचे सर्व्हिस नेटवर्क उपलब्ध केले जाते. तुम्हाला अॅप, 12 भाषांतील 24×7 कॉल सेंटर, अधिक विस्तार व जलद सेवा यासाठी 160 स्मार्टमोबाइल आणि सीएसएन (कम्प्लिट सॅटिसफॅक्शन नंबर) यांच्या मदतीने या नेटवर्कची मदत घेता येऊ शकते. तसेच, यामुळे ग्राहकांना विशिष्ट कोडद्वारे सेवेचे रेटिंगही नोंदवता येते. उन्हाळ्यातील कमालीच्या उष्णतेचा सामना करण्यासाठी एसी खरेदी करण्याची तातडीची गरज विचारात घेता, आम्ही सर्व महत्त्वाच्या शहरांत, खरेदी केल्याच्या दिवशीच एसी बसवून देण्याची सेवाही देत आहोत.
नवे पर्यावरणपूरक गोदरेज एसी इन्व्हर्टर व फिक्स्ड स्पीड टेक्नालॉजी यामध्ये, स्प्लिट व विंडो, 5 स्टार व 3 स्टार एनर्जी रेटिंगमध्ये उपलब्ध आहेत आणि 1 Tr (~3514 Watts), 1.5 Tr (~5271) व 2Tr (~7028) या कूलिंग क्षमतेमध्ये, 27,900 रुपये ते 73,000 रुपये या दरामध्ये मिळतील.