क्रिआ युनिव्हर्सिटीचा अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमामध्ये नीतिमूल्ये गुंफण्याचा निर्णय
चेन्नई–क्रिआ युनिव्हर्सिटी आणि दलाई लामा सेंटर फॉर एथिक्स अँड ट्रान्स्फर्मेटिव्ह व्हॅल्यूज (“द सेंटर”) यांनी क्रिआ युनिव्हर्सिटीच्या अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी मूल्यशिक्षणाचा अनुभव नव्याने घेण्यासाठी व सह-निर्मित करण्यासाठी आज चेन्नई येथे औपचारिक करार केल्याचे जाहीर केले आहे. क्रिआ युनिव्हर्सिटी अतिशय क्लिष्ट व अनिश्चित विश्वामध्ये भविष्यातील नेतृत्व घडवण्यासाठी नैतिक कारणमिमांसा व निर्णयप्रक्रिया यांचा चालना देण्यावर भर देत आहे. हे सेंटर क्रिआला अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण एथिक्स अभ्यासक्रम समाविष्ट करण्यासाठी मदत करणार आहे.
क्रिआ युनिव्हर्सिटी ही लिबरल आर्ट्स अँड सायन्सेस युनिव्हर्सिटी ऑगस्ट 2019 पासून, अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी पहिल्या बॅचच्या क्लासना सुरुवात करणार आहेत. क्रिआ सुसूत्र शिक्षणाचा पायंडा पाडत आहे – कलेची सांगड शास्त्रांशी घालत आहे आणि इंटलेक्च्युअल इन्क्वायरीची सांगड प्रायोगिक शिक्षणाशी घालत आहे. क्रिआच्या सुसूत्र शिक्षणाच्या दृष्टिकोनामध्ये नीतिमूल्यांचे शिक्षण अविभाज्य भाग ठरणार आहेत, कारण क्रिआच्या शैक्षणिक समितीने तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या आठ मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नीतिमूल्ये हा एक भाग आहे. सर्व अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी नीतिमूल्ये हे बंधनकारक स्किल कोर्स म्हणून प्रस्तावित आहे.
यानिमित्त बोलताना, क्रिआ युनिव्हर्सिटीचे कुलगुरू सुंदर रामस्वामी यांनी सांगितले, “या भागीदारीमुळे क्रिआमधील तरुणांना नैतिक प्रश्नांबद्दल विचार करता येईल, उद्देश शोधता येईल व त्यांच्या कृतीचा समाजावर होणारा परिणाम समजून घेता येईल”. दलाई लामा सेंटरचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व्हेनरेबल तेनझिन प्रियदर्शी यांनी सांगितले, “सध्याच्या आव्हानात्मक काळामध्ये, नव्या पिढीतील तरुण नेतृत्व घडवत असताना, शिक्षणाच्या केंद्रस्थानी नैतिक शिक्षण व नेतृत्व समाविष्ट करण्यास मदत करण्याच्या दृष्टीने ही दोन्ही संस्थांसाठी विशेष संधी आहे. नीतिमूल्ये ही केवळ एक विषय म्हणून शिकवली जाऊ नयेत, तर अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमामध्ये, तसेच क्रिआच्या मूल्यांमध्ये व संस्कृतीमध्येही ती विविध स्वरूपांमध्ये समाविष्ट करावीत.” क्रिआ युनिव्हर्सिटीमध्ये व्हेनरेबल तेनझिन प्रियदर्शी हे प्रॅक्टिस इन ह्युमॅनिटीजचे व्हिजिटिंग प्रोफेसर असणार आहेत.
दे सेंटर पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला, क्रिआ शिक्षकांबरोबर एथिकल लर्निंग व शिक्षणशास्त्र यावर सत्रे सुरू करणार आहे. अभ्यासक्रमातील नीतिमूल्यांच्या पलीकडे, क्रिआ युनिव्हर्सिटी एक संस्था म्हणून उच्च नैतिक मापदंड निर्माण करणे कायम ठेवणार आहे.
दलाई लामा सेंटर फॉर एथिक्स अँड ट्रान्स्फर्मेटिव्ह व्हॅल्यूज जीवनातील नैतिक व माणुसकीच्या पैलूंविषयी चौकशी, संवाद व शिक्षण यासाठी समर्पित आहे. सहयोगात्मक व निःपक्षपाती संस्था म्हणून, द सेंटरचा भर विज्ञान व तंत्रज्ञान ते शिक्षण व आंतरराष्ट्रीय संबंध अशा विविध विषयांतील आंतरशाखीय संधोधन व कार्यक्रमांचा विकास यावर असतो. आमचे कार्यक्रम जबाबदारीवर लक्ष केंद्रित करतात आणि व्यक्ती, संस्था व समाज यांच्यातील यथार्थता व नौतिक उद्देश यांचे परीक्षण करतात.
दलाई लामा व आर्कबिशप एमेरिटस देसमंड तेतू यांच्यासह शांततेच्या नोबेल पुरस्काराचे सहा मान्यवर द सेंटरचे संस्थापक राहिले आहेत. 2009 मध्ये, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी येथे स्थापना झाल्यापासून, द सेंटरचे कार्यक्रम 8 देशांमध्ये विस्तारण्यात आले आहेत.
देशातील काही सर्वोत्तम व्यक्ती व विचारवंत यांचा पाठिंबा असलेल्या क्रिआ युनिव्हर्सिटीचा (www.krea.edu.in) उद्देश उच्च क्षमता असणाऱ्या व्यक्तींना वैविधपूर्ण व परिवर्तनशील विश्वात सकारात्मक, मार्गदर्शक परिणाम नैतिक पद्धतीने निर्माण करणे शिकता येणार आहे. विश्लेषणात्मक विचार, नीतिमूल्ये, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग व संवाद या बाबताती उत्तम कौशल्यांबरोबरच, येथे सर्व शाखांमध्ये 3 वर्षांच्या निवासी बी. ए. (ऑनर्स) व बी. एससी. (ऑनर्स) पदवी उपलब्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचसाठी प्रवेशप्रक्रिया 1 नोव्हेंबर 2018 रोजी सुरू होणार आहे.