यंदाच्या वर्षात निर्यातीच्या नव्या बाजारपेठांत प्रवेश करणार
गुरुग्राम८ – होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने (एचएमएसआय) आज फन्टॅस्टिक नाव्हील्यूशनने एक लाख ग्राहकांना आनंदी केल्याचे जाहीर केले. ऑटो एक्स्पो २०१६ मध्ये मोठ्या धामधुमीत नाव्हीचे लाँच करून होंडाने दुचाकी क्षेत्रात खळबळ उडवून दिली. देशातील बहुचर्चित दुचाकी ‘होंडा नाव्ही’ ही होंडा आर अँड डी भारताद्वारे तयार करण्यात आलेली पहिली शंभर टक्के भारतीय गाडी असून तिच्या संकल्पनेपासून व्यावसायिक उत्पादनापर्यंतचे सर्व काम भारतातच करण्यात आले आहे.
केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात आनंदाचे क्षण निर्माण करणारी होंडा नाव्ही आता यंदाच्या वर्षात डोमिनिकन रिपब्लिक आणि कोस्टा रिका या दोन नव्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार आहे. सध्या दहा देशांमध्ये नाव्हीची निर्यात केली जाते.
या विक्रमी कामगिरीबद्दल श्रीय यदविंदर सिंग गुलेरिया – वरिष्ठ उपाध्यक्ष, विक्री आणि विपणन, होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. म्हणाले, ‘ट्रेंडी नाव्ही ही तरुणांसाठी अनोखे स्टाइल स्टेटमेंट तयार करणारी ट्रेंडसेटर गाडी आहे. हीचे अभिनव डिझाइन, एकंदर लूक्स आणि आपल्या आवडीप्रमाणे बदल करण्याची अमर्याद क्षमता यामुळे केवळ भारतातीलच नव्हे, तर संपू४ण जगभरातील दुचाकीप्रेमींना भुरळ घातली आहे. ते सर्व जण नाव्हीच्या फन राइडचा आनंद घेत आहेत आणि अभिनव ग्राहक पर्याय आजमावून पाहात आहेत.’
आपल्या नेहमीच्या रुपात नाव्ही डिझाइन स्टेटमेंट आहेच, शिवाय तिचे कस्टमायझेशन पर्याय पाहाण्यासाठी, राइडचा आनंद घेण्यासाठी आणि निर्मिती करण्यासाठी आकर्षक आहेत. २०१८ च्या आवृत्तीमध्ये स्टायलिश फ्युएल गॉज, मेटल मफलर प्रोटेक्टर अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, ती अधिक सोयीस्कर आहेत. ही गाडी दोन नव्या रंगात – रेंजर ग्रीन आणि लडाख ब्राउनमध्ये उपलब्ध असून त्याला ग्रॅब रेल, हेडलाइट कव्हर, रिअर व्ह्यू मिरर्स, स्पोर्टी लाल रंगाचे कुशन्स अशा वैशिष्ट्यांची जोड देण्यात आली आहे. यामुळे गाडीचे लूक्स आणखी फनटॅस्टिक दिसतात.
होंडा नाव्हीला १०९ सीसी इंजिन देण्यात आले आहे, जे सात हजार आरपीएमवर आठ पीएस देते आणि ट्यूबलेस टायर्ससह ५५०० आरपीएममध्ये ८.९६ एनएम टॉर्क देते. गाडीला पुढे वरून खालच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागच्या बाजूला हायड्रॉलिक मोनोशॉक बसवण्यात आले आहे. नाव्हीची किंमत ४४,७७५ रुपयांमध्ये (एक्स शोरूम दिल्ली) उपलब्ध करण्यात आली आहे.
स्टँडर्ड नाव्ही सहा रंगांत उपलब्ध करण्यात आली आहे – पॅट्रिअट रेड, शास्ता पांढरा, स्पार्की ऑरेंज, ब्लॅक, न्यूरेंजर ग्रीन, न्यू लडाख ब्राउन