महिला कैद्यांना कौशल्ये व रोजगार देण्यासाठी समूहाने येरवडा सेंट्रल प्रिझनशी केला सहयोग
सारांश
· तुरुंगातील महिला कैद्यांना कौशल्ये देण्यासाठी स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुप आणि येरवडा सेंट्रल प्रिझन, पुणे यांच्यामध्ये सीएसआरचे सरकारी-खासगी भागीदारी मॉडेल. · ऑटोमोटिव्ह लॉकसेट सब अॅसेम्ब्लीचे उत्पादन करणार. · समूह सुरुवातीला 25 – 30 महिला कैद्यांना कच्च्या मालापासून फिनिश्ड गुड्सच्या अॅसेम्ब्लीपर्यंत डेडिकेटेड शॉप फ्लोअरवर काम करण्याचे प्रशिक्षण देणार. · भारतातील तुरुगांमध्ये स्पार्क मिंडा, अशोक मिंडाने सुरू केलेला 5वा प्रकल्प. |
पुणे: स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुपने जेल आवारातील महिला कैद्यांमध्ये ऑटोमोटिव्ह लॉकसेट सब-अॅसेम्ब्ली उत्पादनाचे युनिट बसवण्यासाठी व स्थापन करण्यासाठी पुण्यातील येरवडा सेंट्रल प्रिझनशी सहयोग केला आहे. तुरुंगामध्ये ऑटोमोटिव्ह लॉक पार्ट्स युनिट सुरू केल्याने महिला कैद्यांना मूलभूत रोजगार मिळवता येईल आणि ऑटोमोटिव्ह लॉक्सचे उत्पादन व फिनिशिंग यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये साध्य करता येतील.
स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुपची (NSE: MINDACORP, BSE: 538962) प्रमुख कंपनी असलेल्या मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेडने निश्चित केलेल्या निकषांनुसार, येरवडा जेलमधील विशेष महिला सेलमध्ये 25 – 30 महिला कैद्यांची निवड करण्यात आली आहे. महिला कैद्यांना ऑटोमोटिव्ह लॉकसेटची निर्मिती करण्यासाठी शॉप फ्लोअरवर काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. समूह जेल अधिकाऱ्यांकडे कम्प्लायन्स वेजेस देतील आणि जेल अधिकारी ते पैसे कैद्यांना देतील. ग्राहकांना पुरवठा करण्याव्यतिरिक्त, ही उत्पादने आफ्टर-मार्केटमध्येही विकली जातील.
मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड “एमसीएल” आणि येरवडा सेंट्रल प्रिझन, पुणे यांच्यामध्ये 15 फेब्रुवारी, 2018 रोजी परस्पर सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. एमओयूच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये, लॉक सेट्सचे उत्पादन करण्यासाठी ऑटोमोटिव्ह उत्पादन अॅसेम्ब्लीची स्थापना करण्याचा समावेश आहे. एमसीएल येरवडा जेलमध्ये उत्पादनाची मूलभूत माहिती व मूलभूत प्रशिक्षण देणार आहे. सरकारी-खासगी भागीदारी अंतर्गत प्रिझन प्रकल्प हा समूहाने आतापर्यंत औरंगाबाद, तिहार व येरवडा येथे सुरू केलेल्या सीएसआर उपक्रमांचाच विस्तार आहे. विशेष उत्पादन प्रकल्प स्थापन केल्याने समूहाला तयार वस्तूंचा पुरवठा केला जाईल, शिवाय महिला कैद्यांना जेलच्या आवारात व बाहेर रोजगार मिळवण्यासाठीही मदत होईल. स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुपच्या सीएसआर उपक्रमांचा भाग म्हणून, जेलच्या आवारात नियुक्त केलेले एमसीएलचे अधिकारी व पर्यवेक्षक दैनंदिन काम करत असताना, प्रोत्साहनपर उपक्रमही आयोजित करणार आहेत. जसे, सर्वोत्तम कर्मचारी, कार्यक्षम लाइन, सर्वोत्तम सूचना निवडणे व WOW उपक्रमाचे कौतुक करणे.
स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुपने एमओयूनुसार, येरवडा जेलमध्ये संपूर्ण मशीनरी, कच्चा माल, वस्तूंची वाहतूक आणि गुणवत्ताविषयक अन्य व्यवस्था व प्रक्रिया अशी गुंतवणूक केली आहे. एमसीएलच्या देखरेखीखाली जेलमधील कैदी शॉप-फ्लोअर चालवणार व सांभाळणार आहेत.
या उपक्रमाविषयी बोलताना, स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुपचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक मिंडा म्हणाले,“आम्ही नेहमी निरनिराळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत असतो. समूहाने उत्पादन प्रकल्प स्थापन करणे व जैलमधील कैद्यांना सहभागी करून घेणे, हा जेलमधील कैद्यांचे जीवन सुधारण्यासाठी, तसेच भविष्याच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये व्यवसायविषयक मूल्ये रुजवण्यासाठी त्यांना मदत करण्याच्या विशेष पद्धतींचा एक भाग आहे. कैद्यांना रोजगार मिळण्याच्या हेतूने सुरू केलेल्या आमच्या सामाजिक उपक्रमासाठी आवश्यक असलेल्या मंजुरी देण्यासाठी वायसीपी अधिकारी सहकार्य करतात व प्रोत्साहन देतात. स्त्री हा खऱ्या अर्थाने समाजाचा अविभाज्य भाग आहे आणि स्त्रीला सबल केल्यास संपूर्ण समाज सबल होऊ शकतो, तसेच आगामी पिढ्यांमध्येही स्त्रीची भूमिका महत्त्वाची असते. समाजाचे ऋण फेडण्यासाठी आम्ही करत असलेल्या छोट्याशा प्रयत्नामुळे जेलमधील कैद्यांच्या मानसिकतेत बदल आणण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे.”
उद्घाटनाविषयी, स्पार्क मिंडा फाउंडेशनच्या अध्यक्ष सारिका मिंडा यांनी सांगितले, “आम्ही बऱ्याच वर्षांपासून तुरुंग अधिकाऱ्यांबरोबर काम करत आहोत आणि आतापर्यंत औरंगाबाद जेल, तिहार जेल व येरवडा जेल यांबरोबरचे आमचे काम सुरळित सुरू झालेले आहे. आम्ही आता असंख्य कैद्यांना कौशल्ये व रोजगार उपलब्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत, कैद्यांना नोकरी दिल्याने त्यांना रोजगार मिळवण्यासाठी मदत होतेच, शिवाय त्यांना उद्योग क्षेत्राची माहिती होती व स्वतःच्या उत्पादकतेचीही जाणीव होते. आमचे असे सामाजिक कल्याणाचे उपक्रम राबवण्यासाठी नेहमी सहकार्य करणाऱ्या येरवडा जेलमधील अधिकाऱ्यांचे विशेष आभार. आमच्या समूहाने सुरू केलेल्या प्रिझन प्रोजेक्ट्सना, सीएसआर टाइम्सने देशातील सर्वात नावीन्यपूर्ण सीएसआर मॉडेल म्हणून गौरवले आहे आणि यासाठी आमच्या फाउंडेशनचा सन्मान करण्यात आला. महिला कैद्यांची कार्यक्षमता आम्ही ओळखतो आणि ती कधीही केवळ घरगुती कामांपुरती मर्यादित नसेल”.
जेलची शिस्त अबाधित राखण्यासाठी, सर्व कामे सुरळीत होण्यासाठी कच्चा माल आतमध्ये आणणे व तयार झालेल्या वस्तू बाहेर पाठवणे, या गोष्टी मिंडा कॉर्पोरेशनच्या नियंत्रणात ठेवण्यात आल्या आहेत. ही सर्व प्रक्रिया राबवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना जेलमध्ये नियुक्त केले आहे; त्यामुळे समन्वय साधला जाईल आणि प्रक्रिया दर्जदार पद्धतीने केली जाईल. कंपनीच्या गरजांनुसार व्यवस्था व धोरण राबवले जात असल्याची दक्षता घेण्यासाठी, व्यवस्थापनाची टीम या युनिटला वेळोवेळी भेट देईल.
स्पार्क मिंडा येथील सीएसआर
स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुप गेली काही दशके सामाजिक विकासाचे उपक्रम राबवत आहे. वायसीपी प्रकल्प हा समूहाचा चौथा जेलबरोबरचा उपक्रम आहे. पहिला उपक्रम सन 2005 मध्ये, जर्मनीतील ड्रेसडन जेल येथील प्लास्टिक पार्ट्ससाठी सुरू करण्यात आला. अशाच प्रकारचा एक प्रकल्प तिहार जेलमध्ये एप्रिल 2014 मध्ये वायर हार्नेस अॅसेम्ब्लीसाठी आणि नंतर औरंगाबादमध्ये 2016 मध्ये लॉक बॉडी अॅसेम्ब्ली युनिटसाठी सुरू करण्यात आला. दिवंगत एस. एल. मिंडा यांनी, मोगा देवी मिंडा चॅरिटेबल ट्रस्ट याअंतर्गत सन 1987 मध्ये समूहाच्या सीएसआर प्रकल्पांची सुरुवात केली. मिंडा बालग्राम – निराधारांसाठी बालगृह; एस. एल. मिंडा सेवा केंद्र – कौशल्य प्रशिक्षण केंद्र; मोगा देवी मिंडा मेमोरिअल स्कूल – गावातील शाळा आणि एस. एल. मिंडा स्पोर्ट्स अकॅडमी हे काही ट्रस्टचे प्रमुख उपक्रम आहेत.
एक जबाबदार कॉर्पोरेट हा वारसा जपत असताना, समूहातील सीएसआर उपक्रम पीपल, प्लॅनेट व प्रॉफिट या ट्रिपल बॉटम लाइन मॉडेलपासून प्रेरित आहेत. सामाजिक कल्याण व पर्यावरणाची शाश्वतता या मुख्य संकल्पनेच्या मदतीने सीएसआर उपक्रमांचे नियोजन केले जाते व संपूर्ण समूहात अंमलबजावणी केली जाते. प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्या जाणाऱ्या व सहयोगात्मक उपक्रमांचा लाभ नेहमी समाजाला होतो. मिल्येनिअम डेव्हलपमेंट गोल व कंपनी कायदा, 2013 अंतर्गत सीएसआर यांच्यापासून प्रेरणा घेऊन, समूहामध्ये सध्या पुढील प्रमुख मुद्द्यांसंदर्भात काम केले जाते – शिक्षण;व्यावसायिक प्रशिक्षण व रोजगाराला चालना; आरोग्य व स्वच्छता; विशेष व्यक्ती असलेल्यांना पाठिंबा; पर्यावरणविषयक शाश्वतता व महिला सबलीकरण. सीएसआर प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी, समूहाने स्पार्क मिंडा फाउंडेशनची स्थापना केली आहे.
स्पार्क मिंडा फाउंडेशन ही कंपनी कायदा, 2013 मधील कलम 8 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली कंपनी असून ती मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड (NSE: MINDACORP, BSE: 538962) या स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुपच्या आघाडीच्या ऑटोमोटिव्ह व प्रमुख कंपनीची 100% उपकंपनी आहे. समूहाचे सध्या सुरू असलेले बहुतेकसे समाज विकास प्रकल्पस्पार्क मिंडा फाउंडेशनअंतर्गत चालवले जात आहेत. स्पार्क मिंडा फाउंडेशनअंतर्गत, प्रमुख समाज विकास प्रकल्प उत्तर प्रदशातील ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्धा नगर, तामिळनाडूतील पल्लईपक्कम जिल्हा व उत्तरखंडातील उपनगरी भाग व महाराष्ट्रातील राजगुरूनगर येथे सुरू आहेत. दर्जेदार अंमलबजावणी व घटक असलेले हे प्रकल्प प्रामुख्याने बालके, युवक व महिला यांच्यासाठी फायदेशीर आहेत.
स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुपविषयी
स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुप ही ओईएमसाठी एक आघाडीची ऑटोमोटिव्ह कंपोनंट उत्पादक असून, समूहाचे मुख्यालय भारतात नवी दिल्लीनजिक गुरगाव येथे आहे. समूहाची स्थापना सन 1958 मध्ये, दिवंगत एस. एल. मिंडा यांनी केली आणि आज या समूहाला ऑटोमोटिव्ह कंपोनंट उत्पादक म्हणून अंदाजे 60 वर्षांची परंपरा आहे. हा समूह पुढील तीन श्रेणींतील एक आघाडीचा ऑटोमोटिव्ह कंपोनंट उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहे – सेफ्टी, सिक्युरिटी अँड रिस्ट्रेंट सिस्टीम;ड्रायव्हर इन्फर्मेशन अँड टेलिमॅटिक्स व प्लास्टिक इंटिरिअर्स. हा समूह सर्व प्रमुख प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने, मोटरसायकल व स्कूटर, ऑफ-रोड व्हेइकल्स आणि भारत व परदेशातील – युरोप, एनएआर, सीआयएस व आशियायी देश – टिअर 1 उत्पादक यांना 35 अद्ययावत उत्पादन प्रकल्पांद्वारे सेवा देत आहे. तसेच, समूह अंदाजे 500 डीलरच्या डीलर डिस्ट्रिब्युटरशिपद्वारे भारतातील आफ्टर मार्केट श्रेणीला सेवा देतो. समूहाने अमेरिका, जपान, इटली व उझबेकिस्तान येथील अनेक आघाडीच्या कंपन्यांशी विविध संयुक्त भागीदारी केली आहे.