शहिदांच्या माता-पित्यांसह जवानांचा सहभाग- एकात्मता रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे
स्वातंत्र्यदिनानिमित्त माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सहकारनगर परिसरात आयोजित केलेल्या एकात्मता रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रॅलीत शहीद जवानांचे आई -वडील बंधू आणि जायबंदी झालेले जवान यांचा सहभाग लक्षवेधी ठरला.
रॅलीचा प्रारंभ राजीव गांधी ई लर्निग शाळेच्या प्रांगणात शहीद जवान सौरभ फराटे यांचे आई मंगल फराटे , वडील नंदकुमार फराटे यांचे हस्ते ध्वजारोहण करुन झाला त्यानंतर राजीव गांधी शाळेपासुन गजानन महाराज चौक, सारंग सोसायटी, अरणेश्वर चौक मार्गे शिवदर्शन चौकापर्यंत ही एकात्मता रॅली काढण्यात आली. या रॅलीत भारतीय सैन्य दलातील शूर जवान चंदु चव्हाण ,सातारा येथील शुर जवानअमित घोरपडे व निसर्ग फिजिकल अकादमीचे श्रीराम कदम सहभागी झाले होते.
रॅलीमध्ये युवकांनी सादर केलेले देशभक्ती पर पथनाट्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. रॅलीचे जागोजागी नागरीकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. गेली ७ वर्षे श्री आबा बागूल एकात्मता रॅलीचे आयोजन करत असतात. रॅलीमध्ये युवक, युवती, नागरीक व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. माजी आमदार व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते श्री उल्हासदादा पवार, माजी राज्यमंत्री श्री. बाळासाहेब शिवरकर, पुणे शहरातील अनेक आजी माजी नगरसेवक, दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी जवान चंदु चव्हाण म्हणाले की, आशा उपक्रमांमूळे जवानांना सीमेवर लढण्यास बळ मिळते.आबा बागुल म्हणाले की, तरुणांना देशाप्रती अभिमान, अस्मिता जागृत करण्यासाठी आणि सर्व भारतीयांनी एकदिलाने,गुण्यागोविंदाने राहण्यासाठी एकात्मता रॅलीचे आयोजन केले जाते.
दरवर्षी माजी महापौर श्री आबा बागूल व श्री अमित बागुल व त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने सिमेवर जे जवान शहीद होतात किंवा जे जवान चांगली कामगिरी करतात अशा जवानांच्या घरी शौर्याची गुढी उभारली जाते व त्यांच्या कुटुंबीयांसोबत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. रॅलीचे नियोजन अमित बागुल व सहकाऱ्यानी केले.