पुणे-नागरिकांचा विरोध असताना , पक्की घरी जिथे आहेत अशा पर्वती तावरे कॉलनी येथील सर्व्हे नंबर ४७ येथे दडपशाहीने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येतो आहे अशी तक्रार माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केल्यानंतर या ठिकाणी पालिकेच्या समंतीशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये, असे आदेश पालिका आयुक्तांनी आज झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाला दिले आहेत.विकसक आणि अधिकारी यांच्या संगनमताने हा प्रकल्प नागरिकांचा विरोध डावलून स्वहितासाठी रेटला जातो आहे असा आरोप बागुल यांनी केला होता .
पर्वती तावरे कॉलनी येथील जागेवर एसआरए करण्यासाठी नागरिकांचा विरोध आहे. भूसंपदनाची कार्यवाही चालू असताना सदर जागेवर एसआरए प्रकल्प उभारण्याचा घाट विकसक आणि एसआरए अधिकारींच्या संगनमताने घातला जात आहे.मुळात या जागेवर जुनी पक्की घरे आहेत, असे असताना दडपशाहीचा जोरावर एस आर ए प्रक्लप राबविण्याच्या प्रकारा विरोधात माजी उपमहापौर, नगरसेवक आबा बागुल यांनी वेळोवेळी हरकत घेतलेली आहे. त्यामुळे पर्वती तावरे कॉलनी येथील सर्व्हे नंबर ४७ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत पालिकेच्या समंतीशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये, असे आदेश पालिका आयुक्तांनी झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाला दिले आहेत.