पुणे : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे व टुरिझम व हॉस्पिटॅलिटी स्कील कौन्सिल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 26 जूलै 2018 रोजी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटियन एज्युकेश्न सोसायटी, आझम कॅम्पस, कॅम्प, गोळीबार मैदानाजवळ, पुणे येथील आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेजमध्ये सकाळी 9 ते दुपारी 4 वा.पर्यंत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात इयत्ता 1 ली ते पदवीधर पास / नापास पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या तसेच आयटीआयमधून प्लंबर, इलक्ट्रीशियन, एअर कंडीशनिंग व रेफ्रिजरेशन रिपेअरिंग व मेन्टेनन्सचे कोर्स केलेल्या 18 ते 30 वयोगटातील युवक, युवतींना टुरिझम व हॉस्पिटॅलिटी सेक्टर मधील विविध पदांसाठी चांगल्या वेतनाचे रोजगार उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. आवश्यकतेनुसार प्रशिक्षणाची सेाय देखील उपलब्ध होणार आहे. तसेच मेळाव्याच्या ठिकाणीच हॉटेल, रेस्टॉरंट, रस्ते, जल, हवाई वाहतूक व पर्यटन या क्षेत्रांमध्येही नोक-या उपलब्ध होणार आहेत. संबधित आस्थापना, उद्योजक यांचे प्रतिनीधी सदर ठिकाणी उपस्थित राहून पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना लागलीच नियुक्ती पत्रही देण्यात येणार आहे. या मेळाव्याअंतर्गत महिला उमेदवारांनाही रोजगार मिळण्याच्या दृष्टीने संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
पात्रता धारण केलेल्या सक्षम तसेच दिव्यांग युवक, युवतींनी रोजगार मेळाव्यामध्ये मुलाखतीस येताना फोटोसहित असलेला आपला ओळखीचा पुरावा आणावा. व प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे या कार्यालयाशी (दुरध्वनी क्र. 020-26133606, 26050085) संपर्क साधावा, असेही श्रीमती पवार यांनी कळविले आहे.