राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्षपदी चेतन तुपे यांची निवड…
आज राष्ट्रवादी काँग्रेस ची बैठक पार पडली यावेळी पुणे आणि इतर जिल्ह्यांतील शहाराध्यक्षांची निवड करण्यात आली पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांची शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली..शहरअध्यक्ष पदासाठी अनेक जन इच्छुक होते..गेली कित्येक दिवस शहराध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होणार या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.अखेर आज चेतन तुपे यांच्या नावाची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली .. पक्ष्याध्यक्ष शरद पवार यांनी टाकलेल्या जबाबदाऱ्या पक्षाची ध्येय धोरण पक्षातील सर्व कार्यकर्ते आणि सर्वाना बरोबर घेऊन पक्षाचं काम तळागाळातील जन्मानसंपर्यंत पोहचवून पक्ष भक्कम करण्याचा मी भविष्य काळात प्रयत्नशील राहील अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली..